दोघांना विवस्त्र करून मारहाण
By Admin | Updated: August 7, 2014 15:26 IST2014-08-07T01:36:53+5:302014-08-07T15:26:21+5:30
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे प्रवीण भिकन पाटील (35) आणि 28 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

दोघांना विवस्त्र करून मारहाण
>जळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे प्रवीण भिकन पाटील (35) आणि 28 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर या मारहाणीचे छायाचित्रणही करण्यात आले.
वस्तुत: ही घटना रविवारी रात्री 8़3क् वाजेच्या सुमारास घडली. मात्र पाचोरा पोलिसांनी या प्रेमी युगुलाला शिवीगाळ व दमदाटी करून
प्रकरण दडपण्याचा प्रय} केला. पण बुधवारी हा प्रकार उघडकीस
आला.
प्रवीण याचा विवाह 2क्क्6मध्ये झाला असून त्याला तुषार हा सहा वर्षाचा मुलगा आह़े मात्र पत्नी मनीषा लग्नानंतर काही वर्षांनी माहेरी निघून गेली. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहेत़
प्रवीणचे गावातीलच एका 28 वर्षीय विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले. प्रवीण त्या विवाहितेसोबत पाचो:यात एका भाडय़ाच्या खोलीमध्ये राहतो़ हे सासरच्या मंडळींच्या सहन झाले नाही. त्यामुळे रविवारी शेदवाडी येथून सासरच्या 13 जणांनी पाचो:यात येत प्रवीण व त्याच्या प्रेयसीला विवस्त्र करून बेदम मारहाण केली़ एवढय़ावरच न थांबता त्याच अवस्थेत प्रवीण व त्याच्या प्रेयसीचे छायाचित्रिकरण करून व फोटो काढले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलीस खडकदेवळा येथे दाखल झाले. मात्र आरोपींच्या कृत्यांना आळा घालण्याऐवजी पोलिसांनी उलट प्रवीण व आपणास शिवीगाळ केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आह़े
तसेच औरंगाबाद येथील एका न्यायाधीशाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आह़े या प्रकारानंतर पाचोरा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन दोघांना जळगाव येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)