शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

#KamalaMillsFire - आत्याला वाचवण्यासाठी गेलेले 'ते' दोघे सापडले मृत्यूच्या दाढेत

By वैभव देसाई | Updated: December 29, 2017 23:35 IST

मुंबई- लोअर परेलमधल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 15 जण जिवानिशी गेलेत.

मुंबई- लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 14 जण जिवानिशी गेलेत. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. धैर्य ललानी हा अमेरिकेत नोकरी करतो. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त तो भारतात आला होता.सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विश्व ललानी हा भाऊ धैर्य ललानी आणि आत्या प्रमिला केनिया यांना पार्टीनिमित्त सोबत घेऊन हॉटेल वन अबव्हमध्ये गेला आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला. आग लागल्याचं समजताच विश्व ललानी आणि धैर्य ललानी लागलीच हॉटेलच्या बाहेर आले. परंतु आत त्यांची आत्या प्रमिला केनिया अडकल्याचं समजताच पुन्हा त्यांनी हॉटेल वन अबव्हमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये कुठलीही खिडकी नसल्यानं दोन्ही भावांना बाहेर पडता आले नाही.इतरांच्या मृतदेहाजवळ या दोन्ही भावांना आत्या प्रमिला या बेशुद्धावस्थेत दिसल्या. आत्याच्या बचावासाठी गेलेला एक भाऊ आगीमुळे वॉशरूममध्ये अडकला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्यामुळे दुसरा भाऊ आत शिरला. परंतु तोसुद्धा परतला नाही, असे एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितले. काही वेळानंतर हे दोघे भाऊ आणि त्यांची आत्या हे तिघेही मृतावस्थेत सापडले. तिघांच्या मृत्यूची वार्ता समजताच ललानी कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. सकाळी या तिघांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर धैर्य आणि विश्व यांचे वडील जयंत ललानी हे  निःशब्द झाले.आत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या दोन्ही भावांना प्राण गमवावे लागले. महिन्याभराची सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आलेल्या धैर्यचा प्रवास हॉटेल वन अबव्हमध्येच संपला. पोलिसांनी हॉटेल वन अबव्ह पबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस नेमकी आग कशामुळे लागली आहे, याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडवfireआगMumbaiमुंबई