डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

By Admin | Updated: December 22, 2015 02:33 IST2015-12-22T02:33:33+5:302015-12-22T02:33:33+5:30

डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोमवारी फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळावरील रक्ताचे नमुने तसेच काही ठसे मिळवले आहेत

Both of the doctors in the murder case of a doctor | डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

डॉक्टर दाम्पत्याच्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

इस्लामपूर : डॉ. कुलकर्णी दाम्पत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोमवारी फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळावरील रक्ताचे नमुने तसेच काही ठसे मिळवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर तपासाला आणखी गती येण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री डॉ. प्रकाश कुलकर्णी (६२) व त्यांच्या पत्नी डॉ. अरुणा (५५) यांचा खून करण्यात आला. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. डॉ. कुलकर्णी यांना शनिवारी भेटणारे मित्र तसेच त्यांचे आर्थिक व्यवहार, गेल्या महिना-दीड महिन्यात त्यांच्याबाबत घडलेल्या घडामोडी अशा सर्व बाजूने चौकशी सुरू आहे.

Web Title: Both of the doctors in the murder case of a doctor