बोरीवली-ठाणे-राजापूर एस.टी. आजपासून
By Admin | Updated: April 1, 2015 02:24 IST2015-04-01T02:24:46+5:302015-04-01T02:24:46+5:30
मुंबई, ठाण्यातील कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी एस.टी. महामंडळाने बोरीवली-ठाणे-राजापूर ही नवीन बससेवा सुरू केली आहे. ही बस १ एप्रिलपासून

बोरीवली-ठाणे-राजापूर एस.टी. आजपासून
ठाणे : मुंबई, ठाण्यातील कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी एस.टी. महामंडळाने बोरीवली-ठाणे-राजापूर ही नवीन बससेवा सुरू केली आहे. ही बस १ एप्रिलपासून रोज सायंकाळी ७ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता राजापूरला पोहोचेल. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय दूर झाली आहे.
परीक्षा संपल्यावर मुलांना सुट्या लागल्यावर मुंबईकरांची पावले कोकणातल्या आपापल्या गावांकडे वळतात. बोरीवली आणि ठाणे परिसरातील रहिवाशांसाठी थेट बोरीवली ते राजापूर बससेवा नव्हती. ही बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही याबाबत एसटी महामंडळाकडे मागणी लावून धरली होती. त्याला महामंडळाने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आता ही बससेवा सुरू होत आहे.
ही बस दररोज सायंकाळी ७ वाजता बोरीवलीतून सुटेल आणि पहाटे ५ वाजता राजापूरला दाखल होईल. परतीसाठी रोज सायंकाळी ५.३० वाजता राजापूर येथून सुटेल. या बसचे आरक्षण सुरू आहे. बोरीवलीहून ही बस घोडबंदर रोडने ठाणे, खोपट आगार येथून बेलापूर रस्त्याने पनवेल, पेण, गोवा रस्त्याने धावणार आहे. या बसचे थांबे काशिमीरा पोलीस स्टेशन, शिवाजी चौक काशिमीरा, कासारवडवली घोडबंदर रोड, खोपट मध्यवर्ती एस.टी. स्टँड, रबाळे पोलीस स्टेशन, नेरूळमार्गे ही निमआराम बससेवा असेल. याचा या परिसरातील प्रवाशांना फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)