सीमेवर तणाव; अधिवेशन गुंडाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:55 IST2019-02-28T05:55:29+5:302019-02-28T05:55:31+5:30

मुंबई : सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुरुवारी, २८ फेब्रुवारी रोजीच गुंडाळण्यात येणार ...

Border tension; Will the convention be wrapped up? | सीमेवर तणाव; अधिवेशन गुंडाळणार?

सीमेवर तणाव; अधिवेशन गुंडाळणार?

मुंबई : सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुरुवारी, २८ फेब्रुवारी रोजीच गुंडाळण्यात येणार असल्याचे सूत्राकडून समजते.


बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून सर्वपक्षीय बैठकीबाबत कळविले. मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनाही विधानभवनात पाचारण करण्यात आले होते. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यास अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते दिवाकर
रावते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित
पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आदी उपस्थित होते.


राज्यात हाय अलर्ट आहे. मोठया प्रमाणावर ‘इनपूट’ येत आहेत. त्यामुळे अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे. अधिवेशनासाठी ५ हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा ताण वाढू शकतो, म्हणून अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करुन संपवून टाकू, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली असल्याचे समजते.

आजच बजेटला आणि लेखानुदानाला मंजुरी
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपणार हे रात्री उशिरा स्पष्ट झाले, कारण उद्याच्या कार्यक्रम पत्रिकेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला व शेवटचा दिवस दाखवला आहे. अर्थसंकल्प मंजुरी व लगेचच लेखानुदानास मंजुरीही शुक्रवारी दाखवली आहे, शिवाय दुष्काळावरील चर्चाही कामकाजात दाखवलेली नाही.

Web Title: Border tension; Will the convention be wrapped up?