कुंदन पाटील -
जळगाव : वीजनिर्मितीचा ‘टक्का’ वाढविण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याच्या क्षमतावाढीसाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार दीपनगर (जळगाव) आणि कोराडी (नागपूर) औष्णिक विद्युत केंद्रांसाठी ‘महाजनको’ने जळगाव आणि नागपूर महानगरपालिकेशी करार केला आहे. नागपुरात २०० एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) पाणी कोराडी प्रकल्पापर्यंत पोहोचविणारी अतिरिक्त यंत्रणा पूर्णत्वास येत आहे, तर आगामी वर्षभरात जळगावमध्येही नव्याने उच्च क्षमतेची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यातून सिंचनाला ‘बूस्टर’ मिळणार असून, पिण्याच्या पाण्याचीही समस्या दूर होणार आहे.
दीपनगर प्रकल्पासाठी तापी नदीतून एक कोटी लिटर पाण्याची उचल केली जाते. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने दीपनगरसाठी जळगाव शहरात एक स्वतंत्र प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
जळगावात सद्य:स्थितीत ४८ लाख लिटर क्षमतेचा एक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. तसेच आता ६० लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारून या दोन्ही प्रकल्पांचा दीपनगरला पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर कोराडी प्रकल्पासाठी नव्याने २०० ‘एमएलडी’चा अतिरिक्त सांडपाणी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे.
सांडपाण्याचा प्रवासभांडेवाडी ते कोराडी १५ किमीजळगाव ते दीपनगर ३६ किमी