शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

ठाकरे सरकारचे डोळे उघडले; एसटी कर्मचाऱ्यांना बोनस, महिन्याचा पगार लगेचच देणार

By हेमंत बावकर | Published: November 09, 2020 4:40 PM

Salary And Diwali Bonus to ST Employee: एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.

मुंबई : एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. यानंतर टीकेचे धनी झालेल्या ठाकरे सरकराने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एका महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

 आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझा पी.एफ.व एलआसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले होते. 

एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार थकलेला आहे. त्यापैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे. या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना दिला जाईल. दिवाळी बोनसही दिला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांनी हे तात्पुरते संकट आहे, टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन परब यांनी केले आहे. तसेच एसटीच्या ज्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आज एका तासात महिन्याचा पगार आणि सणाची अग्रणी रक्कम वळती केली जाईल, असेही परब यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील पगार देण्यासाठी पत्रकही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जारी केले असून त्यावर थकित पगाराचा निधी मध्यवर्ती कार्यालयाकडून वळता करत असून लवकरात लवकर कर्मचाऱी, अधिकाऱ्यांना त्यांचे देय वेतन द्यावे, असे या आदेशात म्हटले आहे. या पत्रावर देशव्यापी लॉकडाऊनमुळे एसटीला पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. यामुळे ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर अशा तीन महिन्यांचे वेतन थकल्याचे कबूल करण्यात आले आहे.  

टॅग्स :state transportएसटीSuicideआत्महत्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Parabअनिल परबCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस