ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २ - फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी पहाटे झालेल्या धाडसी चोरीचा अवघ्या ८ तासात छडा लावण्याची प्रशंसनीय कामगिरी गुन्हेशाखेच्या पथकाने बजावली. या प्रकरणी तिघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाख, १९ हजारांची रोकड जप्त केली. आकाश संजय आगुलवार (वय २२), सचिन रामचंद्र शरणागत (वय २५, दोन्ही रा. रामेश्वरी हनुमान मंदीराजवळ) आणि रोहित संदीप दुधे (वय २४, रा. रामेश्वरी पार्वतीनगर, अजनी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यातील आगुलवार आणि शरणागत अट्टट घरफोडे आहेत. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांना ही माहिती दिली.
फायनान्स कंपनीतील धाडसी चोरीचा पर्दाफाश
By admin | Updated: August 2, 2016 17:50 IST