‘बम बम भोले’..!

By Admin | Updated: August 30, 2015 02:49 IST2015-08-30T02:49:56+5:302015-08-30T02:49:56+5:30

रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोल-ताशांच्या गजरात धर्मध्वजा डोलाने मिरवत पवित्र कुशावर्तात

'Bomb Boom Bhole' ..! | ‘बम बम भोले’..!

‘बम बम भोले’..!

त्र्यंबकेश्वर : रंगीबेरंगी फुलमाळांनी सजविलेली वाहने, त्यावर चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या आखाड्यांच्या श्री इष्टदेवता व ढोल-ताशांच्या गजरात धर्मध्वजा डोलाने मिरवत पवित्र कुशावर्तात स्रान करण्याच्या लागलेल्या ओढीतून ‘बम बम भोले’ अशा घोषणा देत जत्थ्याने निघालेल्या दहाही आखाड्यांच्या हजारो साधू-महंतांचे पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान सहा तासांनंतर पार पडले.
आखाड्यांच्या शाही मिरवणुकीत भाविकांनी केलेल्या घुसखोरीमुळे पोलिसांना वेळोवेळी करावा लागलेला हस्तक्षेप व त्यातून झालेली रेटारेटी, आखाड्यांच्या महंतांना त्यासाठी करावी लागणारी मध्यस्थीचे प्रकार वगळता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या स्रानाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
शनिवारच्या शाहीस्रासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री नरेंद्रगिरीजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडिया, जगत्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदजी, शांतीगिरी महाराज यांच्यासह प्रमुख आखाड्यांचे श्री महंत सहभागी झाले होते. शाहीस्रानासाठी त्र्यंबकेश्वरच्या दहाही आखाड्यांच्या वेळा अगोदरच निश्चित करण्यात आलेल्या असल्या तरी, आखाड्यापासून निघणाऱ्या मिरवणुका व प्रत्यक्ष कुशावर्तापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी पाहता, शाहीस्रानाचा पहिला मान असलेल्या पंचदशनाम जुना आखाड्याने दिलेली वेळ काटेकोरपणे पाळत ४ वाजून १० मिनिटांनी कुशावर्त गाठले.
यावेळी पुरोहित संघाने मंत्रोच्चाराच्या गजरात जुना आखाड्याच्या इष्टदेवतांना आवाहन करून आखाड्याचे प्रमुख महंत श्री हरिगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व ‘हर हर महादेव’ असा
गजर करून साधू-महंतांनी कुशावर्तात स्वत:ला झोकून दिले. यावेळी श्री श्री अवधेशानंदजी, विश्वेश्वरानंदजी, शंकरानंद गिरीजी महाराज, प्रकाशानंद गिरीजी यांच्यासह शेकडो साधूंनी हातातील धर्मध्वजा, शस्त्रांसह पर्वणीत स्रान केले. या आखाड्याच्या प्रमुख महंतांचे स्रान पार पडल्यानंतर संत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतीगिरीजी महाराज यांनीही आपल्या अनुयायांसह स्रान केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Bomb Boom Bhole' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.