‘टायगर’च्या पाठीशी अवघे बॉलीवूडकर!

By Admin | Updated: May 7, 2015 02:31 IST2015-05-07T02:31:19+5:302015-05-07T02:31:19+5:30

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन गुन्ह्यासंदर्भात झालेली ५ वर्षांची शिक्षा व जामीन यावर सकाळपासूनच टिष्ट्वट्सचा अक्षरश: पाऊस पडला.

Bollywood's back to 'Tiger' | ‘टायगर’च्या पाठीशी अवघे बॉलीवूडकर!

‘टायगर’च्या पाठीशी अवघे बॉलीवूडकर!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन गुन्ह्यासंदर्भात झालेली ५ वर्षांची शिक्षा व जामीन यावर सकाळपासूनच टिष्ट्वट्सचा अक्षरश: पाऊस पडला. सलमानचे चाहते त्याला झालेल्या शिक्षेबद्दल दु:ख व्यक्त करीत होते़ सोशल मीडियावर काही जण या निकालाला पाठिंबाही देत होते. मात्र पार्श्वगायक अभिजितने केलेल्या वादग्रस्त टिष्ट्वटमुळे सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात पेटून उठला आणि त्याच्यासह सलमानविरोधातही टीकेची झोड उठली.
सलमानचे चाहते त्याचा बचाव करीत होते. त्याने केलेली चांगली कामे, मानवतावादी कामे यांचा उल्लेख चाहत्यांकडून केला जात होता. पण विरोधक त्यांच्यावर आग पाखडत होते. त्यांच्या मते कायदा सर्वांना सारखाच लागू असावा़ आरोपी किती मोठा, यावर कारवाईचे स्वरूप अवलंबून राहू नये.
वुई स्टँड बाय सलमान व सलमान व्हर्डिक्ट यासारखे हॅशटॅग टिष्ट्वटरवर चालत असून, लोक सलमानच्या बाजूने व विरोधात दावे करीत आहेत. व्हाय डू बॅड थिंग्ज हॅपन टू गुड पीपल, आय स्टँड बाय यू अशा प्रतिक्रियांनी  ट्विटर दणाणले आहे.

सलमानच्या शिक्षेनंतरही निर्माते धास्तावले
> सलमान खान केवळ एक कलाकार नाही, तर त्याची गणना ज्याच्या चित्रपटावर कोट्यवधी रुपये लावले जातात अशा सुपरस्टारमध्ये केली जाते. स्टारडम व बॉक्स आॅफीसवरील त्याची पकड कधीच शिथिल होत नाही, कधीच त्याच्या यशबद्दल शंका उपस्थित केली जात नाही.

> सलमानसारख्या ताऱ्यांच्या चित्रपटावर जसे कोट्यवधी रुपये लावल जातात, तशीच त्याच्या चित्रपटावरील जोखीमही जास्त असते. यामुळेच सलमान तुरुंगात जाणार म्हटल्यानंतर त्याच्या चित्रपटांचे भविष्य टांगणीला लागून चित्रपट निर्मात्यांचे प्राण कंठाशी आले आहेत.

> आजमितीस सलमानच्या नावावर तीन चित्रपट येऊ घातले आहेत. त्यात ‘राजश्री’चा ‘प्रेम रतन धन पायो’ व कबीर बेदी यांचा ‘बजरंगी भाईजान’ आणि करण जौहरच्या कंपनीच्या ‘शुद्धी’चा समावेश आहे.
---------
अ‍ॅड. आभा सिंग यांना १० हजारांचा दंड : सलमान निर्दोष सुटावा यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे न्यायालयात सादर केले. याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारा अर्ज अ‍ॅड. आभा सिंग यांनी न्यायालयात केला होता. तसेच या प्रकरणी गायक कमाल खान याचीही साक्ष नोंदवावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र हे दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळले. या बिनबुडाच्या अर्जांमुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया गेला, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांनी अ‍ॅड. सिंग यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
----------
शेअर बाजारात सलमान इफेक्ट
मुंबई शेअर बाजारात बुधवारी झालेल्या विक्रमी घसरणीला अभिनेता सलमान खान याचाही हातभार लागल्याची चर्चा रंगली होती. सलमान खानशी थेट संबंध असलेल्या ईरॉस आणि मंधाना या कंपन्यांचे समभाग अनुक्रमे ५.७२ टक्के व ४.२४ टक्के असे घसरले.
---------
उद्दाम अभिजित...
टिष्ट्वटरवर लिहिण्याबाबत मर्यादा असते, त्यामुळे मी तसे लिहिले आहे. शिवाय असे अपघात कुत्र्यांबाबत होतात. या बाबतीत प्रसारमाध्यमे माझ्यावर काय बहिष्कार घालणार? मीच त्यांच्यावर बहिष्कार टाकतो. तुम्ही पत्रकार दिवस-रात्र सेलीब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये फ्रीमध्ये दारू पिता़ तुम्ही मला शिकवू नका, अशी प्रतिक्रिया अभिजितने माध्यमांकडे व्यक्त केली.


माफीनामा...
गायक अभिजितच्या या टिष्ट्वटवर सर्व स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली. शिवाय प्रसारमाध्यमांनी याविषयी प्रतिक्रियेबाबत विचारले असता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्याने वाद घातला. सोशल मीडियावरही त्याच्या विरोधातील प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यामुळे सायंकाळी त्याने माफी मागितली.

आय स्टँड बाय यू
सलमानने कायम समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक भान असणाऱ्या या अभिनेत्याबाबत योग्य निर्णय अपेक्षित आहे. - बिपाशा बसू

न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही म्हणणे नाही. मात्र सलमानबद्दल मला नितांत प्रेम आहे, तो मला भेटलेला दिलदार माणूस आहे - रितेश देशमुख, अभिनेता

जो सर्वांसाठी उभा असतो, त्याच्यासाठी मी उभा राहणारच. सलमान तुझा नेहमीच आदर वाटतो. मी आणि तुझे सर्व चाहते तुझ्यासोबत आहोत. - मिका सिंग, पार्श्वगायक

Web Title: Bollywood's back to 'Tiger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.