शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

मराठी गीतांभोवती बॉलीवूडचा ‘पिंगा’!

By admin | Updated: November 29, 2015 01:55 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत

- सुदीप गुजराथी,  नाशिकहिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत निर्माण झाली आहे. मराठीची दखल घेणारे सिनेमे तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरत असल्याने, गेल्या काही वर्षांत मराठी गीतांभोवती बॉलीवूड ‘पिंगा’ घालू लागल्याचे चित्र आहे. सध्या गाजत असलेल्या ‘पिंगा’ गीताने यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. अवघी हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वसलेली असूनही, काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी चित्रपटांत मराठी व्यक्तिरेखा जवळपास दिसत नव्हत्या. बहुतांश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक उत्तरेकडील असल्याने त्यांचा प्रभाव बॉलीवूडवर दिसून येत होता. मराठी व्यक्तिरेखा, गाणी, एवढेच नव्हे, तर मराठी अभिनेत्यांनाही हिंदीत फारसे मानाचे स्थान नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र बॉलीवूडमध्ये संपूर्ण मुंबईत वाढलेली नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर चित्र पालटले आहे. नव्वदच्या दशकातील ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे या मराठी पात्राला देशभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. ‘सिंघम’मध्ये अजय देवगणचे बाजीराव सिंघम हे पात्रही मराठीच होते. ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही हिट झाला होता. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीच्या पात्राचे नाव शशी गोडबोले होते. ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे गाजले होते.‘पिंगा’ला मराठी गीतांचा आधार : बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा’ या गीतातील ‘लटपट लटपट’ हे शब्द व चाल १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या ओळी, तसेच नृत्याच्या स्टेप्स ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या १९७५ च्या चित्रपटातील ‘नाच गं घुमा’ गीतातील मंगळागौरीच्या खेळातील आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपटही व्ही. शांताराम यांचाच आहे. ‘बाजीराव मस्तानी’तील ‘आली अप्सरा... आली सुंदरा’ या गीतातील शब्दही मराठीच आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची घेतली जाणारी दखल सुखावणारी आहे. महेश मांजरेकर, मधुर भांडारकर यांच्यासारखे मराठी दिग्दर्शकही आता सिनेमे बनवत आहेत. मराठी माणूस, इतिहास, साहित्याकडे लक्ष वेधले जाणे ही चांगली गोष्ट आहे. भाषा जितकी वापरली जाईल, तितकी ती टिकते आणि वाढते. मराठी भाषेसाठी हे फायद्याचेच आहे.- कौशल इनामदार, संगीतकार