शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या इंजिनीअरिंगसाठी लखन उचलतोय ‘बोजा’

By admin | Updated: June 15, 2014 00:46 IST

आईवडिल, तीन लहान भाऊ, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी एवढ्या जणांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी लखनने घरदार सोडले. नागपुरात दाखल होऊन रेल्वेस्थानकावर कुलीचे काम सुरू केले. यातच मुलगा इंजिनिअर व्हावा

जीवापाड मेहनत : टिमकीत राहतो एका खोलीतदयानंद पाईकराव - नागपूर आईवडिल, तीन लहान भाऊ, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी एवढ्या जणांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी लखनने घरदार सोडले. नागपुरात दाखल होऊन रेल्वेस्थानकावर कुलीचे काम सुरू केले. यातच मुलगा इंजिनिअर व्हावा यासाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करून हाडाची काडे केली. सध्या लखनचा मुलगा जयपूरला इंजिनिअरींगच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. मुलगा इंजिनिअर व्हावा म्हणून लखन जीवापाड मेहनत करीत असून उद्याचा दिवस सुखाचा येईल या आशेपोटी साऱ्या दुनियेचा ‘बोजा’ आपल्या डोक्यावर घेऊन पै-पै गोळा करीत आहे. लखन सैनी (४८) रा. बालाघाट, राजस्थान याच्या कुटुंबात आईवडिल, पत्नी, तीन भाऊ, दोन मुले आणि एक मुलगी असे एकूण नऊ जण राहतात.मुलगा शिकतोय जयपुरात एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षणासाठी लखनने कामाच्या शोधात नागपूर गाठले. १९९८ पासून नागपूर रेल्वेस्थानकावर कुलीचे काम सुरू केले. लखन दिवसरात्र मेहनत करून मिळालेली कमाई गावाकडे पाठवायचा. हळुहळू लखनची मुलेही शिकून मोठी झाली. मोठा मुलगा बलरामने बारावीत चांगले गुण मिळविले. मुलाच्या या यशानंतर आपला मुलगा इंजिनिअरच व्हावा, अशी खूणगाठ लखनने मनाशी बांधली. परंतु इंजिनिअरींगसाठी खर्च खूप येणार असल्यामुळे एवढे पैसे कुठून आणावे या विचाराने लखन खचला. मग त्याने स्वत:लाच धीर देत काबाडकष्ट करण्याची मनोमन तयारी केली. मुलाचे जयपूरच्या व्हीआयपी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन केले. इकडे दिवस-रात्र मेहनत केली. लखन सध्या टिमकीत एक खोली करून राहतो. हॉटेलचे महागडे जेवण परवडत नसल्यामुळे लखन काम करून खोलीवर गेल्यानंतर हाताने स्वयंपाक करतो. मुलाच्या राहण्याचा, जेवणाचा, कॉलेजच्या बसचा, शैक्षणिक शुल्क असा वर्षाला २ लाखाचा खर्च लखनला करावा लागत आहे. परंतु तरीसुद्धा उद्याचा दिवस सुखाचा येईल, मुलगा इंजिनिअर होईल, या आशेने लखन मेहनत करीत आहे. पुढील वर्षी मुलगा इंजिनिअरींगची पदवी घेईल आणि त्यानंतर आपण कुलीचे काम सोडून देणार असल्याचे लखननेसांगितले. मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी दुनियेचा ‘बोजा’ उचलणाऱ्या लखनच्या जिद्दीला कुणीही दाद द्यावी असेच.