बोईसर जि.प. शाळेच्या मैदानाचे झाले तळे

By Admin | Updated: June 27, 2016 02:47 IST2016-06-27T02:47:01+5:302016-06-27T02:47:01+5:30

शाळेच्या आवारातील पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे

Boiser ZP School grounds | बोईसर जि.प. शाळेच्या मैदानाचे झाले तळे

बोईसर जि.प. शाळेच्या मैदानाचे झाले तळे


बोईसर : बोईसर येथील नवापूर नाक्यावरील जिल्हा परिषदेच्या मराठी व गुजराती माध्यमाच्या शाळेच्या शेजारच्या विकासकाने त्याच्या जागेत नव्याने बांधलेल्या कंपाऊ ड वॉलमुळे शाळेच्या आवारातील पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याने मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.मराठी व गुजराती अशा दोन माध्यमाच्या शाळा असून मराठीचे पहिली ते इयत्ता आठवी तर गुजरातीचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरविले जातात. मराठी शाळेमध्ये ९२ विद्यार्थी व ९१ विद्यार्थीनी असे एकूण १८३ तर गुजराथी शाळेमध्ये ३८ विद्यार्थी व ३४ विद्यार्थीनी असे एकूण ७२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर दोन्ही मिळून २५५ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांनही विकासकाकडे तक्रार केली असून नाला पूर्ववत करतो असे त्याने सांगितल्याचे मुख्याध्यापिका रंजना गोस्वामी यांनी सांगितले या आवारातील एक इमारत मोडकळीस आली असून ती या तुंबलेल्या पाण्यामुळे कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीही जमीनदोस्त करणे गरजेचे आहे.

Web Title: Boiser ZP School grounds