शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

डीएनएमुळे ‘त्या’ मृतदेहांची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 21:17 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड - पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत १७ दिवसांनी सापडलेले मृतदेह वाहक विलास देसाई आणि प्रवासी धोंडू कोकरे

ऑनलाइन लोकमत
दस्तुरी (खेड), दि.05 -  मुंबई-गोवा महामार्गावरील महाड - पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत १७ दिवसांनी सापडलेले मृतदेह वाहक विलास देसाई आणि प्रवासी धोंडू कोकरे यांचे असल्याचे डीएनए चाचणीत निष्पन्न झाले आहे. तब्बल ४८ दिवस रूग्णालयात ठेवलेल्या या मृतदेहांवर आज बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दि. २ आॅगस्ट रोजी रात्री पावणेअकरा ते सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान सावित्री नदीवरील पूल तुटला आणि त्यात दोन एस्. टी. बसेस वाहून गेल्या. दि. ३ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून वाहून गेलेल्या या वाहनांचा व प्रवाशांचा प्रशासनाच्यावतीने शोध सुरु होता. तब्बल बारा दिवसांनी एसटी बसेस व तवेरा गाडी बाहेर काढल्यानंतर प्रशासनाच्यावतीने ही शोध मोहीम थांबवण्यात आली. परंतु या दुर्घटनेतील आणखी काही मृतदेह बेपत्ता होते.
दुर्घटनेनंतर १७व्या दिवशी दि. १९ आॅगस्ट रोजी वेळासनजीक बाणकोट खाडीकिनारी गस्ती पथकातील पोलिसांना दोन मृतदेह सापडले. परंतु ते छिन्नविछीन्न अवस्थेत असल्यामुळे ते कोणाचे आहेत हे नेमके कळणे अवघड होते. प्रशासनाच्यावतीने महाड येथील शासकीय रुग्णालयात सर्व बेपत्तांच्या नातेवाईकांचे डीएनए घेण्यात आले होते. दि. १९ आॅगस्टला हे दोन मृतदेह आढळून आल्यानंतर त्या मृतदेहांचे सॅम्पल काढून डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले होता.
डीएनए अहवाल हाती आल्यानंतर हे मृतदेह जयगड-मुंबई एसटी बसचे वाहक विलास काशिनाथ देसाई (फुणगूस) व जयगड-मुंबई या एसटी बसमधील प्रवासी धोंडू बाबाजी कोकरे (खंडाळा-वरवडे) यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांना या संदर्भात कळवण्यात आले. त्याप्रमाणे बुधवारी देसाई व कोकरे यांच्या नातेवाईकांनी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतले.
मुळात पाण्यात १७ दिवस राहिल्यामुळे छिन्नविछिन्न अवस्था झालेल्या या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे कोठे? असा प्रश्न नातेवाईकांना पडला. ही माहिती आमदार संजय कदम यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तत्काळ या मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन या मृतदेहांवर चिंचघर-प्रभूवाडी येथे अंत्यसंस्कार करावेत. आपल्याला सर्वतोपरी मदत ग्रामस्थांकडून करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजय देसाई व धोंडू कोकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील विष्णू कदम, अरुण पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह चिंचघर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
(विलास देसाई)
 
(धोंडू कोकरे)