शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:34 IST

रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी बुडाली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांनी पोहोत समुद्रकिनारा गाठून स्वत:चा जीव वाचवला.

रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी बुडाली. या दुर्घटनंतर समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या तीन खलाशांचे मृतदेह सोमवारी सापडले. दुर्घटनाग्रस्त बोट शनिवारी सकाळी सात वाजता मासेमारीसाठी निघाली. परंतु, ८.३० वाजताच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ जोरदार लाटा उसळल्या आणि बोट समुद्रात उलटली. त्यावेळी बोटीत एकूण आठ जण होते. यातील पाच जणांनी पोहोत समुद्रकिनारा गाठला. परंतु, उर्वरित तिघांना मृत्यूने कवटाळले.

रायगडमध्ये आठ खलाशांसह बोट समुद्रात उलटल्याची माहिती कळताच स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि तटरक्षक दलांनी घटनास्थळी पोहोचून बेपत्ता झालेल्या तीन खुलाशांचा शोध सुरू केला. बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. नरेश राम शेलार, धीरज कोळी, मुकेश यशवंत पाटील अशी मृतांची नावे आहेत. 

उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची (तुळजाई) बोट समुद्रात उलटली. शनिवार सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हेमंत बळीराम गावंड (वय, ४५), संदीप तुकाराम कोळी (वय, ३८), रोशन भगवान कोळी ( वय, ३९), शंकर हिरा भोईर (वय, ६४) आणि कृष्णा राम भोईर ( वय, ५५) यांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. त्यांना ताबडतोब अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड