१८ तासांनी सापडला मृतदेह, हुंड्याच्या त्रासाला कंटाळून नदीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:18 IST2018-06-25T04:18:26+5:302018-06-25T04:18:28+5:30

शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात शनिवारी दुपारी आईने दोन चिमुकल्यांसह उडी घेऊन आत्महत्या केली होती.

The bodies found after 18 hours, suicides in the river, overwhelmed by the tragedy of dowry | १८ तासांनी सापडला मृतदेह, हुंड्याच्या त्रासाला कंटाळून नदीत आत्महत्या

१८ तासांनी सापडला मृतदेह, हुंड्याच्या त्रासाला कंटाळून नदीत आत्महत्या

धर्माबाद (जि. नांदेड) : शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात शनिवारी दुपारी आईने दोन चिमुकल्यांसह उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यातील एका मुलीचा मृतदेह शनिवारीच सापडला होता. त्यानंतर तब्बल १८ तासानंतर रविवारी आई व दुसऱ्या मुलीचा मृतदेह नदीपात्रात आढळला.
कुंडलवाडी येथील आचारी व्यवसाय करणारा यादव श्रीनिवास कांबळे याच्याकडून होणाºया हुंड्याच्या त्रासाला कंटाळून पूजा ऊर्फ रिंकूबाई यादव कांबळे (३२) हिने शिवानी (६), सुविद्या यादव कांबळे (३) या दोन मुलींना घेऊन शनिवारी शेळगावजवळील गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी सुविद्याचा मृतदेह सापडला होता. परंतु, पूजा व शिवानी यांचा मृतदेह सापडले नव्हते. रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने कुंडलवाडी पोलिसांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. सकाळी आठच्या सुमारास नदीच्या उत्तरेस दहा किलोमीटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले.
या प्रकरणी मृत पूजा हिचे वडील चांदू गणपती वाघमारे (५५) यांच्या फिर्यादीवरून आरोपी यादव श्रीनिवास कांबळे याच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: The bodies found after 18 hours, suicides in the river, overwhelmed by the tragedy of dowry