बोर्डाचे उत्पन्न वाढले,ठेवी पुन्हा बँकांमध्ये
By Admin | Updated: May 9, 2014 22:10 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T22:10:10+5:30
पुणे मालमत्ता करात कँटोन्मेंट बोर्डाने ३ वर्षांनी केलेल्या वाढीमुळे बोर्डाला गेल्या काही महिन्यांपासून भरीव उत्पन्न मिळत

बोर्डाचे उत्पन्न वाढले,ठेवी पुन्हा बँकांमध्ये
पुणे मालमत्ता करात कँटोन्मेंट बोर्डाने ३ वर्षांनी केलेल्या वाढीमुळे बोर्डाला गेल्या काही महिन्यांपासून भरीव उत्पन्न मिळत असून एकाच महिन्यात या माध्यमातून १० कोटी रूपये जमा झाल्याने मध्यंतरी मोडीत काढलेल्या २५ कोटी रूपयांच्या ठेवी पूर्ववत बँकांमध्ये जमा झाल्या आहेत.
एल.बी.टी.आकारण्यास अद्याप न मिळालेली परवानगी, बंद झालेले जकातीचे दरमहा दीड कोटीचे उत्पन्न आदी कारणांमुळे बोर्डाचे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले होते.उत्पन्न वाढ करण्यासाठ् वाहन प्रवेश कर, मालमत्तांचे भाडे आणि मालमत्ता करात सुधारणा हे पर्याय बोर्डाकडे उरले होते.
कर्मचार्यांच्या वेतनासाठीच दरमहा ३ कोटी रूपयांची आवश्यकता असल्याने फेब्रुवारी अखेर बोर्डाने २५ कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्या होत्या.वाहन प्रवेश कर, मालमत्ता कर यातून बरे उत्पन्न मिळू लागल्याने बोर्डाच्या रंेगाळलेल्या विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता असून ५ जून रोजी दुसर्यांदा मुदतवाढ देण्यात आलेल्या बोर्डाची निवडणूक होते किंवा कसे यावर विकासकामांचे भवितव्य आहे. निवडणूक जाहिर झाल्यास आचारसंहितेमुळे कामे होऊ शकणार नाहीत.बोर्डावर प्रशासक आल्यास काही अंशी ही कामे होऊ शकतील, असे सांगण्यात आले.