शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट! बोरीवलीच्या भीमनगर झोपड्यांवर पालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 21:54 IST

बोरिवली पश्चिम गोराई येथील भिमनगर नाल्यात भरणी करून 60 ते 70 अनधिकृत पक्क्या झोपड्यां बांधणे सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई:बोरिवली पश्चिम गोराई येथील भिमनगर नाल्यात भरणी करून 60 ते 70 अनधिकृत पक्क्या झोपड्यां बांधणे सुरू होते .उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी  आणि बोरीवलीचे स्थानिक आमदार  सुनील राणे यांच्या सूचनेनुसार बोरिवलीच्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा निवळे व नगरसेविका अंजली खेडकर यांनी नुकतेच स्ट्रिंग ऑपरेशन आणि फेसबुक लाईव्ह करून यावर प्रकाशझोत टाकला होता.

यावेळी जागेवर जाऊन पाहणी केली असता६० ते ७० झोपड्यांचे पक्के बांधकाम करून झोपडपट्टी दादा त्या झोपड्या विकत आहेत असे निदर्शनास आले अशी माहिती रेश्मा निवळे यांनी लोकमतला दिली. बोरिवलीत उभी राहते मिनी  धारावी या मथळ्याखाली काल लोकमत ऑनलाइन आणि आजच्या लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. राजकीय वर्तुळात आणि पालिका प्रशासन स्तरावर लोकमतचे वृत्त व्हायरल झाले आणि पालिकेची यंत्रंणा कामाला लागली.

आमदार सुनील राणे यांनी सदर बांधकाम निष्कासित करण्याची मागणी लावून धरली.आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व बोरिवली पोलिसांच्या बंदोबस्तात पालिका प्रशासनाने येथील 11 झोपड्यांवर तोडक कारवाई केली. परंतू अजूनही अनधिकृत झोपड्या येथे असून त्यावर पालिकेने  कारवाई केलीच पाहिजे व संबंधित झोपडपट्टी दादांवर एम आर टीपी दाखल करावी अशी मागणी भाजपाने केली आहे.

उर्वरित झोपड्यांवर येत्या सोमवारी पून्हा कारवाई होणार असून जर कारवाई झाली नाही तर पालिकेला घेराव घालण्यात येइल असे भाजपा तर्फे सांगण्यात आले. या करवाईबद्दल गोराईकरांनी समाधान व्यक्त केले आहे. तर लोकमतने सदर वृत्त देऊन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांनी लोकमतचे आभार मानले आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईborivali-acबोरिवली