इलेक्ट्रिक बॉक्सवरुन अनुष्काला BMC ने पाठवली नोटीस

By Admin | Updated: April 10, 2017 13:35 IST2017-04-10T12:28:33+5:302017-04-10T13:35:43+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माला इलेक्ट्रीक बॉक्स प्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे.

BMC sent Anuskkers to Electric Box | इलेक्ट्रिक बॉक्सवरुन अनुष्काला BMC ने पाठवली नोटीस

इलेक्ट्रिक बॉक्सवरुन अनुष्काला BMC ने पाठवली नोटीस

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माला इलेक्ट्रिक बॉक्स प्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अनुष्का वर्सोव्याच्या बद्रीनाथ टॉवरच्या 20 व्या मजल्यावर रहाते. हा संपूर्ण मजला अनुष्काच्या मालकीचा आहे. इथे ती आपल्या कुटुंबासोबत रहाते. अनुष्काने मजल्याच्या पॅसेजमध्ये इलेक्ट्रीक बॉक्स बसवला आहे. या बॉक्सवर सोसायटी माजी सचिव सुनिल बात्रा यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. 
 
हा इलेक्ट्रिक बॉक्स बेकायद असल्याची त्यांनी पालिकेकडे रीतसर तक्रार दाखल केली. अनुष्का शर्माने सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. महापालिकेच्या अधिका-यांनी अनुष्काच्या निवासस्थानी जाऊन या बॉक्सची पाहणी केली. हा बॉक्स धोकादायक आढळल्याने पालिकेने तिला हा बॉक्स हटवण्याचे निर्देश दिले आहेत असे बात्रा यांनी सांगितले. 
 
बात्रा यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून रीतसर परवानगी घेतल्यानंतरच इलेक्ट्रिक बॉक्स बसवण्यात आल्याचे अनुष्काने सांगितले. के वॉर्डच्या सहाय्यक अभियंत्याने 6 एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात अनुष्काला हा बोर्ड हटवण्याच्या सूचना केल्या आहेत.  

Web Title: BMC sent Anuskkers to Electric Box