BMC Election 2017: मतदानापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे युतीचे संकेत
By Admin | Updated: February 20, 2017 20:20 IST2017-02-20T18:17:42+5:302017-02-20T20:20:39+5:30
महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

BMC Election 2017: मतदानापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे युतीचे संकेत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पण एकत्र यायचं असल्यास पारदर्शकता हा मुद्दा कायम असेल हे सांगायलाही ते विसरले नाहीत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेना-भाजपा युतीचे संकेत दिले. भाजपाकडून युतीचे संकेत मिळाले असले तरी याबाबत शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मतदानाच्या पुर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत दिलेल्या या संकेतामुळे मतदारांमध्ये संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.
(मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)
मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या आहेत.
(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)