शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात धान्य बाजारात निरुत्साह

By admin | Updated: July 16, 2015 04:05 IST

पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निरुत्साह दिसत आहे. खरीप पिकांची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी

- प्रशांत तेलवाडकर,  औरंगाबादपावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजारात समितीत निरुत्साह दिसत आहे. खरीप पिकांची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी शिल्लक शेतीमाल विकणे थांबविले आहे. खरेदीदारांनीही आखडता हात घेतल्याने दररोज साधारणपणे ५ कोटींची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेत सध्या केवळ ४५ ते ५० हजारांचे व्यवहार होत आहेत.पावसाने दगा दिल्याने शेतातील पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. विभागात दुबार पेरणीचे संकट उभे आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य, कडधान्य विक्रीला न काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा धान्य बाजारावर परिणाम झाला आहे. दैनंदिन आवक जवळपास ९५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे गहू, तूर, हरभरा, उडीद, मूग, हरभरा व तूरडाळीचे भाव कडाडले आहे. मागील ३० वर्षांत अशी कठीण परिस्थिती उद्भवली नव्हती. तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे; पण धान्याच्या आवकेवर एवढा मोठा परिणाम पहिल्यांदाच जाणवत आहे, असे खरेदीदार शिखरचंद सेठी यांनी सांगितले.उत्पन्न घटले : जून २०१४ मध्ये ५़३९ लाख रुपये मार्केट फी जमा झाली होती. जून २०१५ मध्ये बाजार समितीचे उत्पन्न घटून २़३५ लाख रुपये झाले. जुलैमध्ये १५ दिवसांत अवघी २० हजार ११६ रुपयांची मार्केट फी जमा झाली आहे. आठवडाभरापूर्वी फळ-भाजीपाला मार्केटमध्ये दररोज १० ते १२ हजार रुपये मार्केट फी जमा होत होती. ती सध्या ५ ते ६ हजार रुपयांवर आली होती.