दीक्षाभूमीत निळा महासागर

By Admin | Updated: October 4, 2014 02:05 IST2014-10-04T02:05:52+5:302014-10-04T02:05:52+5:30

हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या बौद्ध बांधवांचा निळा महासागर शुक्रवारी दीक्षाभूमीवर उसळला होता. विशाल, उचंबळणारा, गजर्णारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता,

Blue ocean in Dikshapatbhutra | दीक्षाभूमीत निळा महासागर

दीक्षाभूमीत निळा महासागर

>धम्मचक्र प्रवर्तन दिन : थायलंडचे मेजर जनरल थनसक पूमपेच यांची उपस्थिती
नागपूर : हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या बौद्ध बांधवांचा निळा महासागर शुक्रवारी दीक्षाभूमीवर उसळला होता. विशाल, उचंबळणारा, गजर्णारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता, तो येथील माती मस्तकी लावण्यासाठी, नवीन उर्जा घेण्यासाठी.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी. बौद्ध बांधवांचे जत्थे दीक्षाभूमीवर रात्री उशिरार्पयत येत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या 58व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यास प्रमुख पाहुणो म्हणून थायलंडचे मेजर जनरल थनसक पूमपेच उपस्थित होते. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलङोले होते.स्तुपातील बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. तेथे ग्रंथप्रदर्शन व पुस्तकविक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
थायलंड हे एक बुद्धिस्ट राष्ट्र आहे. त्यामुळे तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्या भारतात झाला त्या राष्ट्राबद्दल आम्हाला अतिव आदर आहे, असे मेजर जनरल थनसक पूमपेच यावेळी सांगितले.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला केवळ धम्मच दिला नाही, तर जीवन जगण्याचा एक मंत्र दिला आहे. त्यामुळे बुद्धिस्ट व्यक्ती कुठल्याही देशाचा असो तो केवळ बुद्धिस्ट असतो, असे थायलंडमधील ज्येष्ठ पत्रकार  डॉ. रंगथीप छोटनापलाई म्हणाल्या.
सदानंद फुलङोले म्हणाले, नागपूर बौद्ध प्रशिक्षण केंद्र (बुद्धीस्ट सेमिनरी) उभारण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. बाबासाहेबांच्या स्वप्नातील बौद्ध प्रशिक्षण केंद्र दीक्षाभूमीवर लवकरच उभारण्यात येणार असून त्याचे नेतृत्व भंते विमलकिर्ती गुणसिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधला दुवा..
च्थायलंड आणि भारत ही स्वतंत्र राष्ट्रे आहेत. या दोन्ही राष्ट्रांना जोडण्याचे काम बुद्ध धम्माने केले आहे. त्यामुळे धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधला दुवा आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल थनसक पूमपेच यांनी केले. 
च् बुद्धांचा जन्म ज्या भारतात झाला त्या राष्ट्राबद्दल आम्हाला अतिव आदर आहे. भारतासोबत थायलंडचे संबंध प्राचिन काळापासूनचे मैत्रिचे राहिले असून यापुढेही कायम राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 

Web Title: Blue ocean in Dikshapatbhutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.