शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अंधत्व निवारण कार्यक्रमाला खीळ!

By admin | Updated: September 4, 2016 01:10 IST

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी राज्यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाला २०१०पासून

- सुमेध वाघमारे,  नागपूर

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी राज्यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाला २०१०पासून विशेष सुरुवात झाली. सुरुवातीला नेत्रोद्दीपक कामगिरी बजावलेल्या या कार्यक्रमाला गेल्या वर्षापासून काही प्रमाणात खीळ बसली आहे. लेन्स, चष्मे व औषधांचा तुटवडा पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोतिबिंदूच्या तब्बल एक लाख शस्त्रक्रिया कमी झाल्यात. परिणामी, आता या कार्यक्रमालाच शस्त्रक्रियेची गरज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत २०२०पर्यंत अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्के इतके खाली आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. डोळ्यांबाबत उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देणे, अंधाचे सर्वेक्षण करणे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून दृष्टिदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना चष्मापुरवठा करणे आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. तसेच ११व्या पंचवार्षिक योजनेनुसार डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू व्यवस्थापन, बुब्बुळ प्रत्यारोपण, व्हिट्रोरेटायनल सर्जरी व बालपणातील अंधत्व यांचा आर्थिक मदतीसाठी समावेश करण्यात आला आहे. मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्याला प्राधान्य देऊन २००९-१०पासून ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. वार्षिक ७ लाख २५ हजार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तीन वर्षे शंभर ते १०० टक्के उद्दिष्ट पार पाडण्यात आले, तर २०१३-१४ साली ८ लाख ९ हजार १२ शस्त्रक्रिया, २०१४-१५मध्ये ८ लाख ८ हजार ५३५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कामगिरी नेत्रोद्दीपक अशीच आहे, मात्र आता जी आकडेवारीमध्ये घसरण झाली ती धक्कादायकच आहे. २०१५-१६मध्ये ७ लाख ६ हजार १३८ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या. तब्बल १ लाख २ हजार ३९७ शस्त्रक्रिया कमी झाल्या. नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांचा जर विचार केला तर २०१४-१५मध्ये २४, १६० शस्त्रक्रिया झाल्या तर २०१५-१६मध्ये २०,५१० शस्त्रक्रिया झाल्या. ३,६५० शस्त्रक्रिया कमी झाल्या. या कार्यक्रमांतर्गत उपसंचालक आरोग्य विभागाला लेन्स, चष्मे व औषधांचा साठा मागणीच्या तुलनेत फारच कमी मिळाला. यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येते. साहित्याचा ठणठणाटनागपूरच्या आरोग्य विभागात सध्याच्या स्थितीत सर्वच साहित्याची कमतरता आहे. परिणामी, नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करणे बंद झाले आहे. अशीच स्थिती राज्यातील इतरही ठिकाणची आहे.राज्यात मोतीबिंदूच्या झालेल्या शस्त्रक्रियावर्षेसंख्या२०१३-१४८०९०१२२०१४-१५८०८५३५२०१५-१६७०६१३८