मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रसेनं दाखवले काळे झेंडे

By Admin | Updated: May 13, 2017 12:42 IST2017-05-13T12:39:25+5:302017-05-13T12:42:22+5:30

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करण्यात आले.

Black flag shown by Youth Congress to Chief Minister | मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रसेनं दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रसेनं दाखवले काळे झेंडे

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद, दि. 13 - मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करण्यात आले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.  शनिवारी (13 मे) मुख्यमंत्री शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह उस्मानाबादमधील शेततळी कामांची पाहणी करण्यासाठी आले होते.
 
यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. वाशी तालुक्यातील पारड फाट्याजवळ ही घटना घडली आहे. 
 
परिस्थिती तणावग्रस्त होऊ नये म्हणून वेळीच पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत सुभाष देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, महादेव जानकर होते.
 
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे जालना जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आहेत. उस्मानाबादमधील घटना पाहता पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुढील दौ-यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. 
 

Web Title: Black flag shown by Youth Congress to Chief Minister