शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप?

By यदू जोशी | Updated: December 9, 2023 08:30 IST

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे

मुंबई : शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीसह (अजित पवार गट) विरोधी पक्षांचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे स्थानिक आजी, माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नेते यांची कामे होत नाहीत, या नाराजीची दखल घेत आता भाजपचे आमदार नसलेल्या मतदारसंघांमध्ये आपल्या माणसांची कामे तत्काळ व्हावीत यासाठी रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी मुंबईत वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना भाजप आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयक म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीकांत भारतीय यांना ओएसडी म्हणून नियुक्त केले होते व भाजप आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयक म्हणून जबाबदारी दिली होती. विधानसभेत गुरुवारी पुरवणी मागण्यांमध्ये सत्तारूढ आमदारांवर निधीची खैरात करण्यात आली होती. 

संघाशी समन्वयाच्या म्हाळगी प्रबोधिनीत बैठकाभाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील समन्वयाच्या बैठका ९ आणि १० डिसेंबर रोजी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे काही पदाधिकारी यांची संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक ९ तारखेला होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्र्यांसोबतची बैठक १० तारखेला होणार आहे. संघ परिवारातील अन्य काही संघटनांसोबतही या दोन दिवसांत बैठका होतील.  

भाजपची १६ ला बैठकउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, लोकसभा, विधानसभा प्रभारी यांची बैठक १६ डिसेंबरला नागपुरात होईल.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. 

कसा घेणार फॉलोअप?भाजपजनांकडून आलेल्या कामांची विभागनिहाय यादी तयार केली जाईल आणि प्रत्येक मंत्र्याकडे ती कामे होण्यासाठी फॉलोअप घेतला जाईल. कोणती कामे झाली आणि कोणती नाही याचा अहवाल दर १५ दिवसांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिला जाणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांमधील भाजपजनांची जी कामे होणार नाहीत, त्याचीही माहिती फडणवीस व बावनकुळे यांना दिली जाईल.

समन्वय समितीची बैठक १४ ला नागपुरात होणारभाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक १४ डिसेंबरला नागपुरात होणार आहे. या बैठकीत महामंडळे आणि विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नियुक्त्यांबाबत ५०:२५:२५ चा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. कोणती महामंडळे कोणाला याचा निर्णय होणे मात्र बाकी आहे.  

टॅग्स :BJPभाजपाAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे