मुखेडमध्ये भाजपाचे तुषार राठोड विजयी
By Admin | Updated: February 17, 2015 01:37 IST2015-02-17T01:37:31+5:302015-02-17T01:37:31+5:30
मुखेड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. तुषार गोविंदराव राठोड ४७ हजार २४८ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले़

मुखेडमध्ये भाजपाचे तुषार राठोड विजयी
मुखेड (जि़ नांदेड) : मुखेड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. तुषार गोविंदराव राठोड ४७ हजार २४८ एवढ्या मताधिक्याने विजयी झाले़ त्यांनी काँग्रेसचे हणमंत पाटील बेटमोगरेकर यांचा पराभव केला़ आ. गोविंदराव राठोड यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती़
मतमोजणीच्या २३व्या फेरीअखेर राठोड यांना १ लाख ३१९ मते मिळाली, तर बेटमोगरेकर यांना ५३ हजार ७१ मते प्राप्त झाली़ या निवडणुकीत अजीमोद्दीन हाफेजसाहब (इंडियन युनियन मुस्लीम लीग) १ हजार १४५, विजय कांबळे (भारतीय रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॉटीक) ४८३, अनिल शिरसे-९६२, अफजलशेख उर्फ शेख सर-२६३, विजयमाला गायकवाड-५११ (सर्व अपक्ष), नोटाला ९६२ मते मिळाली़ (प्रतिनिधी)