शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपाची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री करणार समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 15:33 IST

विरोधकांनी 'संविधान बचाव रॅली' काढल्यानंतर सत्ताधारी भाजपाने त्याला तोंड देण्यासाठी 'तिरंगा रॅली' काढली आहे.

मुंबई- विरोधकांनी 'संविधान बचाव रॅली' काढल्यानंतर सत्ताधारी भाजपाने त्याला तोंड देण्यासाठी 'तिरंगा रॅली' काढली आहे. या तिरंगा रॅलीवर विरोधकांनी टीका केली आहे. तिरंगा रॅली मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. 

या रॅलीत मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार देखील सहभागी झालेत. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून, भाषणही दिलं जाणार आहे. आज दुपारी दोन वाजल्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीनं मार्गक्रमण सुरू केलं आहे. ही रॅली शिवाजी पार्कपासून माटुंगा, रुपारेल कॉलेजजवळून सेनापती बापट मार्गे दादर रेल्वे स्टेशन ते फुल मार्केटकडून पुढे एलफिन्स्टन रोड आणि हुतात्मा बाबू गेनू क्रीडांगण(कामगार मैदान)पर्यंत जाणार आहे, त्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे. 

तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी भाजपाविरोधी संविधान बचाव रॅलीही सुरू आहे. या रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय. आंबेडकर पुतळा ते  गेट वे ऑफ इंडिया अशी ही रॅली काढण्यात आली आहे. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली असून, रॅलीमध्ये कोणल्याही प्रकारची घोषणाबाजी केली जात नाहीये. घोषणाबाजी न करता विरोधकांनी मूक रॅली काढली आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,  खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय हार्दिक पटेल, शरद यादव, ओमर अब्दुल्ला,  सीताराम येचुरी यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही रॅलीत सहभागी झाले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस