भाजपाचे धोरण चुकीचे - राजू शेट्टी

By Admin | Updated: January 29, 2017 00:43 IST2017-01-29T00:43:10+5:302017-01-29T00:43:10+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल त्याला बरोबर घेऊन सत्ता मिळविण्याचे भाजपाचे धोरण चुकीचे असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

BJP's policy is wrong - Raju Shetty | भाजपाचे धोरण चुकीचे - राजू शेट्टी

भाजपाचे धोरण चुकीचे - राजू शेट्टी

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल त्याला बरोबर घेऊन सत्ता मिळविण्याचे भाजपाचे धोरण चुकीचे असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. विधानसभा निवडणुकीनंतर जे घडले, त्यामुळे युती कायमची तुटली असे म्हणता येणार नाही, असेही शेट्टी म्हणाले.
पुण्यात एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, मोठ्या झाडाखाली लहान रोपट्याची वाढ होत नाही. राजकाण हा आमचा धंदा नसून व्यवस्था परिवर्तनासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत.
आगामी निवडणुकीत संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी शिवसेना व इतर पक्षांशी युती करून निवडणूक लढविणार असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's policy is wrong - Raju Shetty