शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

भाजप सर्वांत भ्रष्ट पक्ष : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:29 IST

सांगली : स्वच्छ प्रतिमेचे ढोंग करीत भाजपने देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या भ्रष्ट कारभाराची नोंद केली आहे. देशातील सर्वांत भ्रष्ट पक्ष म्हणून आता भाजपची ओळख होऊ लागली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री

ठळक मुद्देसांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात टीकास्त्र

सांगली : स्वच्छ प्रतिमेचे ढोंग करीत भाजपने देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या भ्रष्ट कारभाराची नोंद केली आहे. देशातील सर्वांत भ्रष्ट पक्ष म्हणून आता भाजपची ओळख होऊ लागली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात केली.कोल्हापूर रोडवरील आचार्य आदिसागर सांस्कृतिक सभागृहात काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर पार पडले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, जयश्रीताई पाटील, सत्यजित देशमुख, आदी प्रमुख नेते उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर्मन सरकारने त्यांच्याकडील बँकांमधील भारतीय गुंतवणूकदारांची यादी सरकारला दिली होती. त्या यादीचे सरकारने काय केले? पनामा पेपर्सने विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या जगातील मोठ्या लोकांची नावे जाहीर केली. याच यादीचा आधार घेत पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांच्यावर कारवाई केली; मात्र भाजप सरकारने ही यादीच सोयीस्करपणे बाजूला केली. त्यानंतर पॅराडाईज पेपर्सच्या माध्यमातून अशाच नावांची आणखी एक यादी प्रसिद्ध झाली. त्यावरही भाजपने मौन बाळगले. फ्रान्सकडून राफेल विमान खरेदीचा निर्णय पूर्वी काँग्रेसने घेतला होता. त्याची किंमत साडेसहाशे कोटी रुपये होती. भाजप सत्तेवर आल्यानंतरच लगेचच त्यांनी याच विमान खरेदीसाठी प्रयत्न चालविले आणि त्यांनी ही विमान खरेदी तिप्पट दराने म्हणजेच १७२५ कोटी रुपये दराने केली. या घोटाळ्याबाबत वारंवार काँग्रेसने आवाज उठविला. तरीही भाजप याविषयी अवाक्षरही काढण्यास तयार नाही. मोहन प्रकाश म्हणाले, इंदिरा गांधींनी बँकिंग व्यवस्था मजबूत केली. मात्र, मोदी सरकारच्या काळात बँकेत भ्रष्टाचार करून उद्योजक देश सोडून पळून जात आहेत., तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत.हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजपच्या नेत्यांना भविष्यातील परिणामांचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्रीसुद्धा ताळतंत्र सोडून टीका करीत सुटले आहेत.पक्षापेक्षा कोणी मोठे समजू नये!पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, याच बालेकिल्ल्यातील सध्याची स्थिती चांगली नाही. जिल्हा पुन्हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला बनवायचा असेल तर गटबाजीची कीड बाजूला केली पाहिजे. गुणवत्तेवर आधारित उमेदवारीचा नांदेड फॉर्म्युला राबविला तरच मोठे यश मिळेल. त्यामुळे पक्षापेक्षा कुणी स्वत:ला मोठे समजू नये.भावे असूनही कॉँग्रेसकडे!मधुकर भावे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी माझी भेट नितीन गडकरी यांच्याशी झाली. त्यांनी मला अजब प्रश्न केला. ‘तुम्ही भावे असूनही भाजपच्या विरोधात कसे बोलता?’ या त्यांच्या प्रश्नावर मी त्यांना योग्य ते उत्तर दिले. देशात कॉँग्रेससारखी विचारधारा मोडीत निघाली तर जाती-धर्मात युद्ध होऊन देशाचे तुकडे पडतील. त्यामुळे यापुढे ‘भाजपला अडवा, भाजपची जिरवा’ हा मंत्र घेऊन सर्वांनी वाटचाल करावी.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस