शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Devendra Fadnavis: भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’; आघाडीतील पक्षांना फडणवीसांशी हातमिळवणीचा प्रस्ताव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 07:14 IST

BJP on Mission Maharashtra: २८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे १०५ सदस्य असून, अन्य १७ आमदारांचा पाठिंबा मिळविण्यास भाजप सक्षम आहे.  भाजपला २८ आमदरांच्या पाठिंब्याची गरज आहे. भ्रष्टाचारामुळे राज्याचे नुकसान होऊ नये अशी भाजपची भूमिका आहे.

- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपची नजर  आता महाराष्ट्र या महत्त्वाच्या राज्यावर  वळली आहे.  २०२२  अखेर होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीआधीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा भाजपच्या आक्रमक श्रेष्ठींचा इरादा आहे.  

गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेख कैकपटीने उंचावला आहे.गोव्यात कोणत्याही अडचणीशिवाय सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी राज्यसभा सदस्य सी. एम. रमेश यांच्यावर सोपविली. ते सध्या  पणजीत ठाण मांडून  आहेत. भाजपला विनाअट पाठिंबा देण्यासाठी चार अपक्ष आणि अन्य आमदार त्यांच्या खोलीबाहेर रांग लावून आहेत. २८८ सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे १०५ सदस्य असून, अन्य १७ आमदारांचा पाठिंबा मिळविण्यास भाजप सक्षम आहे.  भाजपला २८ आमदरांच्या पाठिंब्याची गरज आहे. भ्रष्टाचारामुळे राज्याचे नुकसान होऊ नये अशी भाजपची भूमिका आहे.

चाैकशीचा ससेमिराया राज्यातील सत्तारूढ आघाडीतील प्रत्येक पाचवा आमदार सीबीआय, ईडी, प्राप्तिकर किंवा अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या चौकशीला सामोरे जात असून, यातून दिलासा कसा मिळेल, यादृष्टीने विचार करीत आहेत.

सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चाशिवसेनेचे मत जाणून घेण्याच्या दृष्टीने तसा प्रस्ताव लवकरच दिला जाऊ शकतो आणि सत्ता वाटपाच्या सूत्रावर चर्चाही होऊ शकते. उद्धव ठाकरे राजी नसतील, तर  शिवसेनेचे काही आमदार फुटू शकतात.  ५३ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा जुळवून घेण्यासही भाजपचा विरोध नाही. नाराज अजित पवार हे आघाडीचा खेळ बिघडवू शकतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना २२ आमदारांचा पाठिंबा होता. दुसरीकडे, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कमालीचे अपयश पदरी पडल्याने विधानसभेत ४३ सदस्य असलेला काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र