शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षांना विश्वासात घेण्याची भाजपची हमी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 10:07 IST

BJP: भाजपने आपल्या लहान मित्रपक्षांचे बोट सोडल्याची टीका होत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयात लहान - मोठ्या सर्वच मित्रपक्षांची एक बैठक घेतली.

मुंबई : भाजपने आपल्या लहान मित्रपक्षांचे बोट सोडल्याची टीका होत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयात लहान - मोठ्या सर्वच मित्रपक्षांची एक बैठक घेतली. यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे जाऊ. मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत दर महिन्याला बैठक घेऊ, असा शब्द त्यांनी दिला. 

या बैठकीला शिवसेनेतर्फे शंभुराज देसाई, उदय सामंत, रयत क्रांती संघटनेचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रिपाइंचे अविनाश महातेकर,  शिवसंग्रामचे तानाजीराव शिंदे, पीरिपाचे जयदीप कवाडे, तसेच आ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या रासपाचे आणि माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या बरिएमंचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

आमच्याकडे लोक अडचणी घेऊन येतात. त्या सरकारच्या माध्यमातून सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. ते होणार नसेल तर लोक आमच्यासोबत आणि पर्यायाने महायुतीसोबत येणार नाहीत, अशी भावना मित्रपक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शिवस्मारक, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आदी विषयांवर चर्चा झाली. महामंडळांवरील नियुक्त्या लवकर कराव्यात, तालुका, जिल्हा समित्यांवरील नियुक्त्यांमध्येही मित्रपक्षांना सामावून घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

महिन्यातून एकदा समन्वय बैठक   महायुती म्हणून आपण एकत्रितपणे आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ, भाजप आपल्या कोणत्याही मित्रपक्षाला अंतर देणार नाही, असा शब्द बावनकुळे यांनी दिला. सर्व मित्रपक्षांची महिन्यातून एकदा समन्वयाची बैठक होईल. पुढच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित राहतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे