शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CM फडणवीसांच्या एका फोननंतर शिवेंद्रराजेंनी केली खेळी; शिंदेसेना-राष्ट्रवादीला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:13 IST

भाजपाची ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे.

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजपाने आणलेल्या ट्विस्टने पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपाने केलेल्या खेळीने सत्ता समीकरणाला कलाटणी मिळाली. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. 

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी अचूक राजकीय रणनीतीने अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाच्या बाजूने वळवला. याउलट शिंदेसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी गटाला केवळ ३० मते मिळाली. ज्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले. या निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे स्पष्ट झालं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर भाजपाचा डाव जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाने बाजी मारण्यामागे सर्वात मोठा हात सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे यांचा असल्याचे बोलले जाते. शिवेंद्रराजेंची ही धुरंधर राजकीय खेळी मानली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजपाने बाजी उलटवली असल्याचे समोर आले आहे. भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एका मताने थरारक विजय हा साताऱ्यात भाजपाचा करिश्मा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा विजय ठरला आहे. भाजपाची ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ असे बहुमत असतानाही भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. सातारा जिल्हा परिषद सत्तेसाठी भाजपाने शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार फील्डिंग लावली होती. दुसरीकडे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसातील समन्वय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण यामध्ये भाजपाने मोठे यश मिळवत महायुतीतील मित्रपक्षांनाच धक्का दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis's call leads BJP to victory, shocks Shinde Sena, NCP.

Web Summary : BJP secured Satara Zilla Parishad control after CM Fadnavis's intervention. Shivendraraje's strategy outmaneuvered Shinde Sena and NCP, giving BJP its first victory. Priya Shinde is now president.
टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना