शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sujay Vikhe Patil: "सर्वात आधी PM मोदींचा फोटो वापरून गद्दारी कोणी केली?"; सुजय विखेंचा Uddhav Thackeray यांना रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:57 IST

"शरद पवार शिवसेनेला संपवतील म्हणणारा मी पहिला खासदार"

Sujay Vikhe Patil slams Uddhav Thackeray: महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत धुसफुसीमुळे अखेर जून महिन्याच्या अखेरीस शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांना साथीला घेऊन बंडखोरी केली आणि भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापना केली. या सत्तास्थापनेच्या वेळी आणि त्यानंतरही शिंदे गट सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना आणि त्यांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरूच्चार करताना दिसतो. मात्र, 'गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो किंवा नाव वापरून मतं मागू नये', असा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत बोलून दाखवला. त्यानंतर, भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी उद्धव यांना जळजळीत सवाल केला आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणे किंवा न म्हणणे यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह आहेत. "शिवसेनेतील शिंदे गटावर गद्दारीचा आरोप केला जातो, पण पहिली गद्दारी कुणी केली? भाजपा सेनेची युती होती, तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदींचा फोटो वापरुन कोण निवडून आले? आणि मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपला सोडून काँग्रेस-राष्टवादीशी कोणी युती केली? मग पहिले गद्दार नक्की कोण?" असे रोखठोक सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. ते अहमदनगरच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

"राष्ट्रवादीचे शरद पवार हे शिवसेनेला संपवतील हे म्हणणारा मी पहिला खासदार होतो. ४० आमदारांना शिवसेना सोडून का जावे लागले? त्यात ८ कॅबिनेट मंत्री होते. मुख्यमंत्री सेनेचा असतानाही सेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे निधीसाठी जावे लागl होते. आता शेतकरी, जनतेच्या हितासाठी शिंदे-फडणवीस सरकार बनले आहे. भाजपा हा त्याग करणारा पक्ष आहे. पक्षाचे १०६ आमदार असतानाही ४० आमदार असलेल्‍या गटाचा मुख्‍यमंत्री भाजपाने करुन दाखविला. पंतप्रधानपदी जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत देश सुखी राहील", यावरही सुजय विखे यांनी जोर दिला.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे