शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

“लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:39 IST

Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: वीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणारे एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.

Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: कर्नाटकातीलकाँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकरांचे राज्यासाठी कोणतेही योगदान नव्हते, असा दावा कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये बसवराज बोम्मई यांच्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपाने आक्रमक होत काँग्रेसवर टीका केली आहे. 

हे खूप गंभीर आहे, कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. ते एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे. हे विश्वासाने सांगतोय लिहून घ्यावे. पुढील निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव होईल. कारण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे, या शब्दांत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. 

उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार?

सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे.  त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही, या शब्दांत महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला होता. 

दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस