“शिंदे-फडणवीसांची जय-विरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात, काही शकुनी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 15:50 IST2023-06-28T15:45:27+5:302023-06-28T15:50:59+5:30
उड्डाण पुलाच्या नावावरून आता तेढ नको, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

“शिंदे-फडणवीसांची जय-विरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात, काही शकुनी...”
Sudhir Mungantiwar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव, एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती, शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव देण्यास मंजुरी देण्यात आली. यावर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत ४० पेक्षा जास्त निर्णयाला मंजूरी देण्यात आली. निराधार योजनेस मान्यता दिली. श्रावणबाळ योजनेमुळे ४० लाख मुलाना फायदा होईल. या मुलाच्या खात्यात थेट मदत जमा होणार आहे. तर १३५० हॉस्पिटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर या बैठकीमध्ये १० मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. तर मच्छिमर बांधव जे पाकिस्तान सिमेवर मच्छिमारीसाठी जातात त्यांना अटक होते. अशा मच्छिमारांना सोडवण्याचा व त्याच्या कुटुंबाला ९ हजार महिना देण्याचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीसांची जय-विरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एचटीएमएलला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे वर्सोवा उड्डाण पुलाला सावरकराचे तर एचटीएमएलला अटलजीचे नाव दिले आहे. तर नावावरून काही वाद नाही. काही शकुनी असे वाद करतात. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे जोडीने काम करतात. ही शोलेची जय विरूची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात आहे, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
दरम्यान, २५ वर्षात काही बदल करण्यात वेळ लागेल.काही चूक झाली असं म्हणता येणार नाही. उड्डाण पुलाच्या नावावरून आता तेढ नको आहे. जे निर्णय घेण्यात आले आहेत ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी १५ आॉगस्टपर्यंत आढावा घेतला जाईल. वर्सोवा उड्डाण पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.