शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 15:15 IST

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. मी त्यांच्यासाठी वापरलेले फडतूस-कलंक हे  फार सौम्य शब्द झाले. आता फडणवीस यांची मानसिक तपासणी करण्याची गरज असून महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न पडावा असं कालचं त्यांचं वक्तव्य होतं," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते. परंतु अलीकडच्या काळात आपण ज्या पद्धतीने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहात, ते बघितल्यानंतर आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग‘ केल्यानंतर असेच होणार, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली तो तळ आम्हाला गाठता येणार नाही. पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

ही गुंडांसाठी ‘मोदी गॅरंटी’-

मी मुख्यमंत्री असताना ज्या वेळी पोलिसांवर आरोप झाले, त्यावेळी मी खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा राहिलो होतो. जेवढे लोक आमच्या बरोबर आहेत, त्यांच्यावर एक दबाव आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यातून ह्या हत्या होत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ‘भाजप में आओ, सब भूल जाओ‘ ही गुंडांसाठी ‘मोदी गॅरंटी’ आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलले की, श्वान गाडी खाला आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वेर समोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलवतात अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस