शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:08 IST

महायुतीत भाजपा आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये होणाऱ्या संघर्षातून ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. 

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग दिल्याचं समोर आले आहे. संघाने अजित पवारांसोबतच्या युतीवर भाष्य केल्यानंतर भाजपातील काही नेते उघडपणे अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत होते. त्यावर बावनकुळेंनी नेते, कार्यकर्त्यांना समज दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपा कुठल्याही नेत्यांनी अवाजवी बोलू नये. केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे. खालीही ती स्वीकारावीच लागेल. मी शेवटची वॉर्निंग दिली आहे. यापुढे कुणीही महायुतीतील नेत्यांबद्दल बोलायचं नाही. महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदींसोबत काम करण्यासाठी आहे. कुणीही भाजपा कार्यकर्ता यापुढे महायुतीच्या नेत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

अलीकडेच भाजपा खासदाराच्या पराभवासाठी जबाबदार धरत भाजपा नेते गणेश हाके यांनी अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग असा संग घडला आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेच्या युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी काय काम केलं का, तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम केल्याचा आरोप हाकेंनी केला होता. 

पुण्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

पुण्यातील वडगाव शेरी इथं विकासकामांच्या भूमिपूजनावरून भाजपा नेते जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीवर टीका करत महायुतीचा धर्म काय फक्त भाजपा-शिवसेनेनीच पाळायचा का असा सवाल केला होता. महायुतीचा धर्म पाळणं ही प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे. परंतु वडगाव शेरीच्या आमदारांना महायुतीचा विसर पडलाय अशी टीका त्यांनी केली होती.  तर जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आले असताना तिथे भाजपा नेत्या आशा बुचके यांनी कार्यकर्त्यांसह अजित पवारांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. जुन्नरमधील पर्यटनावर बैठक असताना त्याठिकाणी महायुतीच्या नेत्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत आशा बुचके यांनी अजित पवार आणि स्थानिक राष्ट्रवादी आमदारावर टीका केली होती. त्यामुळे भाजपा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

टॅग्स :BJPभाजपाMahayutiमहायुतीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेAjit Pawarअजित पवार