शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"माध्यमं, उद्योगपती, राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरू", नाना पटोलेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:53 IST

Nana Patole News: माध्यमं, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे.

मुंबई -  माध्यमं, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ("BJP starts blackmailing media, industrialists, political leaders by making baseless allegations", serious allegations by Nana Patole)

माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला, यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल अनंत चतुर्दशी असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाणिवपूर्वक स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला भाजपच्या कुठल्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचा कोणताही मंत्री दोषी नसल्याने त्यांच्या आरोपांची काँग्रेसला कसलीही भीती नाही. ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातोय, हे सारा देश बघतोय. त्यामुळे कोणीतरी ओरडावं आणि आपण त्याकडे लक्ष द्यावं असं करण्याची काहीच गरज नाही. कारण कर नाही त्याला डर कशाला असे पटोले म्हणाले.

किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं. मगच त्यांना खऱ्याअर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून जावे. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्राच्या स्थापनेला आता ६० वर्ष झाली आहेत. स्थापनेपासून ते महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. या ६० वर्षात काँग्रेस सरकारांनी केलेली कामे आणि भविष्यात महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, याचा कार्यक्रम घेऊन लवकरच आम्ही गावागावांपर्यंत जाणार आहोत असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा