शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:54 IST

Raj Thackeray MNS Melava Panvel: तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला.

भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे. मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार...,  अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवत जोरदार फटकेबाजी केली. ते पनवेल येथे आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. राज म्हणाले, "त्या दिवशी आमचा अमित कुठे तरी जात होता, तो काही तरी टोल नाका फुटला, तेव्हा भाजपाने टीका केली, म्हणाले होते, रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायलाही शिका. मला असे वाटते, भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे, मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार... मी तिथे होतो का गाडीमध्ये, निर्लज्ज पणाचा कळस आहे सर्व. सरकारमध्ये का आलात? म्हणे महाराष्ट्राचा विकास करायचाय. अरे कशाला खोटं बोलताय. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा घोटाळा काढला त्यानंतर हे आलेत. एवढेच नाही, तर भुजबळांनी सांगितले असेल आतमध्ये काय काय असते," अशी टीका राज यांनी अजित पवारांवर केली.

तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय -भाषणाची सुरुवात करताना राज म्हणाले, "आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय, या आंदोलनासाठी. एखादे व्यंगचित्र काढावेसे वाटलेले. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय त्याचा काय उपयोग आपल्याला. तिथे जाऊन खड्डेच पहायचेत ते महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता." 

"हा काही मुंबई गोवा महामार्गाचाच भाग नाहीय. नाशिकच्या रस्त्याचीही तिच अवस्था आहे. हे खड्डे काही आज नाही पडलेत. २००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले, त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना, तुम्ही त्याच त्याच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे आम्ही खड्ड्यातून गेलो काय आणि खड्ड्यात गोलो काय? तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेpanvelपनवेल