शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:13 IST

प्रकाश आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दिली भेट

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. मंगळवेढ्यातही अशीच परिस्थिती आहे. स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने चारा छावण्या उभारल्या आहेत. स्थानिक पातळीवर निधी जमा करुन चारा खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.  त्यांना अद्याप अनुदान आलेले नाही. शासनाने चाºयाचा दरही ठरविलेला नाही. उसाचा चारा उपलब्ध आहे. परंतु, तो सुकलेला असल्याने गुरांच्या जिभेला चिरा पडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या नादात भाजप आणि शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते़ पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की,  चारा छावण्यांमध्ये जनावरांसोबत प्रत्येक घरातील एक माणूसही मुक्कामाला आहे. रोजगार हमी योजनेखाली या माणसाची नोंद करुन त्याला मदत मिळायला हवी. चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे ही चूक आहे. हैदराबादला चारा चांगला चारा मिळतो. राज्य सरकारने दुष्काळासाठी विशेष निधीची तरतूद करावी. जिल्हाधिकाºयांना ठराविक दुष्काळ निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आम्ही ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

धरणे, तलावांतील गाळ काढा- दुष्काळाच्या परिस्थितीत धरणे आणि तलावांतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. या परिस्थितीत त्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. त्यासाठी जेसीबी आणि पोकलेन यांचे अधिग्रहण करुन ठेवण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळ