शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची ‘पळवापळवी’! भाजप म्हणतो, २५ आमदार संपर्कात; सेना म्हणते ५० आमदार संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 09:59 IST

एकमेकांच्या आमदारांवरून भाजप, शिवसेनेचे दावे-प्रतिदावे

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हटले जात असतानाच भाजप आणि शिवसेनेने एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचे दावे-प्रतिदावे केले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला, तर या उलट भाजपचेच ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा प्रतिदावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला. महाविकास आघाडीचे बरेच आमदार सरकारवर तीव्र नाराज आहेत आणि २५ आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालणार होते; पण त्यांची समजूत काढली गेली, असा दावा मंत्री दानवे यांनी जालन्यात केला. दानवे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, दानवे यांनी हा दावा कोणत्या नशेत केला, हे मला माहिती नाही. कदाचित आघाडीचे १७५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांना म्हणायचे असेल. संपर्कात आहेत तर घ्या ना, थांबलाय कशासाठी? असा सवालही त्यांनी केला. भाजपचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले.

आमदार फुटल्यास विधानसभेत दिसणार नाही - जयंत पाटीलआमचे आमदार फुटणार नाहीत. जर कुणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. लोकच त्यांना सळो की पळो करून सोडतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या आमदाराविरोधात लढू आणि त्याचा पराभव करू,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. फडणवीसांच्या काळातही एवढा निधी मिळाला नसल्याचे भाजपचे आमदार आम्हाला सांगतात. भाजपचे आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत, असा दावाही त्यांनी केला.

कराड पुड्या सोडतात- अब्दुल सत्तार केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनीही महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याचे वक्तव्य करीत या नाराज आमदारांनी भाजपमध्ये यावे, अशी ऑफर दिली. त्यावर राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला. कराड हे पुड्या सोडण्याचे काम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. नाराज वगैरे कोणीही नाही, असे सत्तार म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv Senaशिवसेना