शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हेमंत करकरेंच्या बलिदानाबद्दल भाजपाला आदरच : विनय सहस्त्रबुध्दे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:27 IST

आपल्या शापामुळेच करकरे यांना शिक्षा झाली या प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे...

ठळक मुद्देपुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी म्हणून सहस्रबुद्धे पुण्यातभाजप महायुतीला भक्कम जनादेश मिळेल असा विश्वास व्यक्त भाजपाने या निवडणूकीत कुठेही हिंदुत्व हा मुद्दा वापरलेला नाही, तो आमचा विचार

पुणे: भोपाळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रज्ञासिंह यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्धल व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाला करकरे यांच्या बलिदानाबद्दल आदरच असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पक्षाचे मध्यप्रदेशचे प्रभारी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. त्या काय म्हणाल्या ते आपण ऐकलेले नाही अशी पुस्तीही त्यांनी नंतर जोडली. आपल्या शापामुळेच करकरे यांना शिक्षा झाली या प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात आलेल्या सहस्रबुद्धे यांना विचारले असता त्यांनी ते मत प्रज्ञासिंह यांचे वैयक्तिक मत आहे अशी पळवाट काढली. त्यावेळी झालेल्या त्रासाच्या उद्वेगातून कदाचित त्या तसे म्हणाल्या असाव्यात, त्या काय म्हणाल्या ते आपण ऐकले नाही, मात्र पक्षाला करकरे यांच्याबद्धल आदरच आहे, पक्ष त्यांच्या बलिदानाचा सन्मानच करतो असे ते म्हणाले.भाजपा शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी म्हणून सहस्रबुद्धे पुण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, जबाबदारीचे भान, परिणामकारक शासनाचा अनुभव, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षण, सामाजिक  न्याय, सरकार व नागरिकांमधील समन्वय यामुळे भाजप महायुतीला भक्कम जनादेश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यावेळी  उपस्थित होते.सहस्रबुद्धे म्हणाले, भाजपाने या निवडणूकीत कुठेही हिंदुत्व हा मुद्दा वापरलेला नाही, तो आमचा विचार आहेच, पण गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवरच मोदी यांच्यापासून सर्वजण बोलत आहेत.  जनादेश मागत आहेत. मागील निवडणूकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केल्याचे सांगत आहोत, त्यातील सुरू असलेल्या गोष्टींना पुर्णत्व देण्यासाठी म्हणून पुन्हा मतांची मागणी करत आहोत. देशातील अनेक राज्यात केलेल्या दौऱ्यानंतर सर्वत्र मोदी यांच्याविषयी जनतेमध्ये असलेला विश्वास दिसला आहे. त्यामुळेच विजय भाजपाच्या दृष्टीपथात आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक