शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

Maharashtra Vidhan Parishad Election BJP Mukta Tilak: 'प्रतिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची!', मुक्ता टिळक विधान भवनात पोहोचताच टाळ्यांचा कडकडाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 13:41 IST

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आमदार मुक्ता टिळक व्हिलचेअरने मतदानासाठी दाखल

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासांत १५०हून अधिक आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या मतदानाच्या वेळी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे दिसून आले. विधान परिषदेच्या आता सुरू असलेल्या निवडणुकीत देखील एक-एक मत अमूल्य आहे. भाजपाचे ४ तर महाविकास आघाडीचे ५ उमेदवार सहज निवडून येतील याबाबत शंका नाही. पण १०व्या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात थेट लढत आहे. यासाठी प्रत्येक मताची आवश्यकता लक्षात घेता पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असतानाही मतदानासाठी मुंबईत दाखल झाल्या आणि त्यांनी पक्षनिष्ठा सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले.  त्या जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले.

राज्यसभेच्या निवडणुकी वेळी कर्करोगाशी झुंज देत असलेले भाजपाचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी आले होते. त्यांच्या एका मताने भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता. तेव्हा हा विजय या दोन आमदारांना समर्पित करण्यात आला होता. आजदेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असताना आणि प्रकृती काहीशी अस्वस्थ असतानाही विधान भवनात दाखल झाल्या आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी, "प्रतिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची!" असे विधान करत त्यांनी साऱ्यांचीच मने जिंकली. त्या जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले.

मुक्ता टिळक यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत; पाहा VIDEO-

मुक्ता टिळक मतदानासाठी विधान भवनात दाखल होताच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "पक्षासाठी हे मतदान महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठेची लढाई असं लोक म्हणत असतील तरी प्रतिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. प्रकृतीपेक्षाही मतदान महत्त्वाचे आहे. कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांना पक्ष अधिक महत्त्वाचा असतो. पक्षाची काही गणिते असतात. त्यामुळे कोणीही आग्रह केला नसला तरी मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात आले आहे", अशा शब्दांत त्यांनी एबीपीमाझाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर त्या विधानभवनात आपल्या कारमधून उतरल्यानंतर कर्करोगाशी झुंज देत असतानाही मतदान करण्यासाठी हजर राहिल्याने त्यांच्या लढाऊ वृत्तीला साऱ्यांनीच सलाम केला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्या मतदानासाठी विधानभवनात दाखल झाल्या.

दरम्यान, १० जूनला राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील मुक्ता टिळक या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्या लढाऊवृत्तीचे कौतुक करण्यात आले होते.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदMukta Tilakमुक्ता टिळकcancerकर्करोगPuneपुणे