शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 16:04 IST

जागा वाटपाचा 'बिहार पॅटर्न' महाराष्ट्रात राबवणार नसल्याचं शहा म्हणाले.

नवी दिल्ली: शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात युती करायची असल्यास आम्ही झुकणार नाही. युतीसाठी आम्ही काहीही गमावण्याच्या, कशावरही पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही, असं शहा म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शहांनी भाजपा खासदारांची बैठक घेतली. त्यावेळी शहांनी युतीबद्दलची आपली भूमिका मोजक्या शब्दांमध्ये स्पष्टपणे मांडली. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक काल दिल्लीत पार पडली. महाराष्ट्रात युती करायची असेल, तर काही गमावून का करायची? काही गमावून अजिबात युती अजिबात केली जाणार नाही, असं शहा म्हणाले. बिहारमध्ये भाजपानं मित्रपक्षांसाठी स्वत:च्या कोट्यातील काही जागा सोडल्या. त्यामुळे संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीला मोठा फायदा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनादेखील भाजपावर दबाव वाढवून अधिकच्या जागा पदरात पाडून घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ही शक्यता शहांनी पूर्णपणे फेटाळून लावली. जी दया नितीश कुमार यांना दाखवली, ती शिवसेनेला दाखवली जाणार नाही, असं रोखठोक मत अमित शहांनी व्यक्त केलं. 'युतीसाठी शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट पाहू. मात्र त्यांच्यासमोर झुकणार नाही,' अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 मतदारसंघांमध्ये लढण्याची आमची तयारी आहे. मात्र आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहू, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश यावेळी त्यांनी खासदारांना दिले. मतदारसंघात जा आणि मतदारांना जास्तीत जास्त वेळ द्या, अशा सूचना त्यांनी खासदारांना दिल्या.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtraमहाराष्ट्र