“तुमची लेकरं परदेशात अन् आमची कायम उसाच्या फडात”; व्हायरल पोस्टवर पंकजा मुंडेचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 04:31 PM2021-09-02T16:31:00+5:302021-09-02T16:33:42+5:30

माझ्या आर्यमनच्या आईच्या रोल मध्ये मी १०० टक्के आहे, किमान पुढचे ८ ते १० दिवस. आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या हॉस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

BJP Pankaja Munde give reply to Facebook User question related to education on her post from boston | “तुमची लेकरं परदेशात अन् आमची कायम उसाच्या फडात”; व्हायरल पोस्टवर पंकजा मुंडेचं उत्तर

“तुमची लेकरं परदेशात अन् आमची कायम उसाच्या फडात”; व्हायरल पोस्टवर पंकजा मुंडेचं उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? ते ही जरा पाहापंकजा मुंडे यांनी फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या पोस्टला दिलं उत्तर गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे परदेशात, मुलाला हॉस्टेलला सोडण्यासाठी बोस्टनमध्ये

मुंबई – गेल्या आठवड्यापासून पंकजा मुंडे या महाराष्ट्रात नाही. पंकजा मुंडे कुठे आहे? असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनीच त्या आईच्या भूमिकेत असून सध्या Boston मध्ये असल्याचं सांगितले. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमन हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. त्याला हॉस्टेलवर सोडण्यासाठी पंकजा मुंडे बॉस्टनला गेल्या आहेत.

पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी स्वत: फेसबुकद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पंकजा मुंडे पोस्टमध्ये म्हणतात की, हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील "पंकजा कुठे आहे?" मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते.  माझ्या आर्यमनच्या आईच्या रोल मध्ये मी १०० टक्के आहे, किमान पुढचे ८ ते १० दिवस. आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या हॉस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे असं त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्या या पोस्टवर लक्ष्मण खेडकर नावाच्या व्यक्तीनं पोस्ट केली. ते म्हणतात की, मा.पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय असी बातमी सोशल मिडीयावर वाचली, आनंद वाटला, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा, पंकजाताई ,आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? ते ही जरा पाहा,लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घर भरणाऱ्या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढा-यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत, कसयं? राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे,तुमच्या लहान भगिनी प्रितम मुंडे ह्या खासदार आहेत तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात, करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात अशी भावना खेडकर यांनी व्यक्त केली आहे.

त्यावर पंकजा मुंडे यांनीही उत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे यांनी सांगितले की, जरूर लक्ष्मण, मी ते करेन. आम्ही पहिल्यांदा अमेरिका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तशाच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्‍या सख्या घेऊन आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी प्रमुख नाही राहिले. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत, आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या उपचारासाठी मदत,कोविड १९ मध्ये कोरोना केंद्र, पूर ग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्यासाठी करणे म्हणजे जगणे आहे. कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही असं त्यांनी उत्तर दिलंय.

Web Title: BJP Pankaja Munde give reply to Facebook User question related to education on her post from boston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.