पेट्रोलचोरीत भाजपाचा पदाधिकारीही

By Admin | Updated: June 27, 2017 01:38 IST2017-06-27T01:38:17+5:302017-06-27T01:38:17+5:30

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नवनीतसिंग तुली या भाजपा पदाधिकाऱ्याच्या पेट्रोलपंपावर छापा टाकून दोन मशिन्स सील केले.

BJP office bearer in petrol, too | पेट्रोलचोरीत भाजपाचा पदाधिकारीही

पेट्रोलचोरीत भाजपाचा पदाधिकारीही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नवनीतसिंग तुली या भाजपा पदाधिकाऱ्याच्या पेट्रोलपंपावर छापा टाकून दोन मशिन्स सील केले.
इंडियन आॅईल कंपनीचा मानकापुरातील ‘रबज्योत आॅटोमोबाईल्स’ हा पेट्रोल पंप नवनीतसिंग तुली यांच्या मालकीचा आहे. पेट्रोलपंपावर इलेक्ट्रॉनिक मायक्रोचीप बसवून ती रिमोटद्वारे संचालित करीत ग्राहकांची फसवणूक करणारी टोळी ठाणे पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आपल्या चार सहकाऱ्यांसह सोमवारी तुलीच्या पेट्रोल पंपावर धडकले. त्यांनी पंपाची तपासणी केली. येथे मायक्रोचीपच्या आधारे पेट्रोल चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील दोन मशिन्स सील केल्या.

Web Title: BJP office bearer in petrol, too