शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

“मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 3:59 PM

मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवालट्विटरच्या माध्यमातून साधला निशाणामुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत - राणे

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. यानंतर मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आला आहे. (narayan rane demands cm uddhav thackeray resign)

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर आता राजकारण तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. 

मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने १५ दिवसांत चौकशी करून अहवाल द्यावा, असे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्दल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?, अशी विचारणा नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

अनिल देशमुख ही मोघलाई नाही

आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. १५ दिवसांत अहवाल द्यायचा आहे. अनिल देशमुख ही चौकशी योग्य प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही, असे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात, असे स्पष्ट केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगNarayan Raneनारायण राणेBJPभाजपा