भाजपा आमदाराच्या अंगरक्षकानं स्वतःवरच झाडली गोळी

By Admin | Updated: June 23, 2017 12:22 IST2017-06-23T12:21:35+5:302017-06-23T12:22:27+5:30

गडचिरोलीतील भाजपा आमदाराच्या अंगरक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या अंगरक्षकाचा मृत्यू झाला आहे.

BJP MLA's bodyguard shot himself shot | भाजपा आमदाराच्या अंगरक्षकानं स्वतःवरच झाडली गोळी

भाजपा आमदाराच्या अंगरक्षकानं स्वतःवरच झाडली गोळी

>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 23 - भाजपाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (23 जून ) सकाळची गजबे यांचे अंगरक्षक भास्कर चौके यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गजबे यांच्या कार्यलयाबाहेरच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. यानंतर चौके यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  
 
भास्कर चौके यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 
 

Web Title: BJP MLA's bodyguard shot himself shot