शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

'४०० जागा जिंकलो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं"; भाजपा आमदाराचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 12:54 IST

"जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले

T. Raja Singh, India as Hindu Nation: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. दोन महिन्यांच्या धामधुमीनंतर ४ जूनला निकाल लागले. त्यात भाजपाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. पण भाजपाने NDA तील मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापना केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतात सरकार स्थापन झाले. पण असे असले तरी भाजपाच्या नेतेमंडळींकडून आजही विधाने करताना दिसतात. तशातच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी एक मोठा दावा केला आहे.

भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी भिवंडी येथे आयोजित केलेल्या धर्मसभेला हजेरी लावली. या धर्मसभेत वेगवेगळे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी जाहीर भाषणात बोलताना टी राजा सिंह यांनी 'हिंदूराष्ट्रा'बाबत एक विधान केले. "लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पार जागा जिंकल्या असत्या तर आपला भारत देश नक्कीच हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," असा दावा टी राजा सिंह यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, "मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही? हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही. वक्फ बोर्ड रद्द करावा. महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावी."

"महाराष्ट्रातील हिंदुत्त्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचे भय आहे? त्यांच्या मागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्त केला पाहिजे. मलंगगडला मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचे सांगून हिंदूंची थट्टा केली जाते. हा मलंगगड मुक्त झाला पाहिजे. जो हिंदू हित की बात करेगा, वह महाराष्ट्र पर राज करेगा," असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारतHinduहिंदूbhiwandiभिवंडीMLAआमदार