शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 10:29 IST

BJP MLA Rajendra Patni passed away: भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या पाटणी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र पाटणी हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते.

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. दीर्घ काळापासून आजारी असलेल्या पाटणी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र पाटणी हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. त्याआधी त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम पाहिले होते. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे.  त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

राजेंद्र पाटणी हे १९९७ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यानंतर २००४ मध्ये ते कारंजा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४  आणि २०१९ मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मागच्या काही काळापासून ते आजारी होते. त्यातच त्यांच निधन झालं. 

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणीBJPभाजपाkaranja-acकरंजा